तलाटी भरती 2026 | MPSC कडून 5707 पदांची मोठी भरती | Next Talati Bharti

Date : 22 July 2026 | प्रशांत पाटील

तलाटी भरती 2026

महत्त्वाची सूचना

ही पोस्ट MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भातील दुरुस्ती (Corrigendum) वर आधारित आहे.

जर तुम्ही यापूर्वी 26 जून 2026 रोजी प्रकाशित झालेली मूळ भरती जाहिरात वाचली असेल, तर कृपया या दुरुस्तीतील बदल देखील अवश्य तपासा.

मूळ भरती जाहिरात वाचण्यासाठी खाली लिंक दिलेल्या पैकी मूळ जाहिरात pdf वाचावी, आणि 22 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील (2619 पदे) वाढवून शुद्धिपत्रकामध्ये  3808 पदसंख्या वाढवून एकूण 5707 पदसंख्या करण्यात आलेल्या आहेत तरी हि जाहिरात MPSC जाहिरात क्रमाक 017/2026 चे शुद्धीपत्रक आहे हे समजावून घ्यावे, अधिक माहितीसाठी लिंक मध्ये असलेल्या तिघी pdf वाचून समजावून घेणे.

तलाटी भरती 2026 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. MPSC Recruitment 2026 अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांसह विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Talati Bharti 2026 साठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, OMR परीक्षा, परीक्षा केंद्र निवड, महत्त्वाच्या तारखा, शुद्धीपत्रक आणि अधिकृत PDF ची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. Talati Bharti 2026 संदर्भातील सर्व नवीन अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Candidates preparing for Talati Bharti 2026 should not miss this recruitment update. MPSC Recruitment 2026 includes vacancies for Gram Mahasul Adhikari (Talati) along with several other government posts. Get complete details about Talati Bharti 2026, including eligibility, application process, exam pattern, Offline OMR examination, exam centre selection, important dates, corrigendum, and official notification PDF on NextBharti.com. Visit NextBharti.com regularly for the latest Talati Bharti 2026 updates and notifications.

तलाटी भरती 2026

जाहिरात क्रमांक :  017 / 2026

जाहिरात द्वारे : MPSC

पदाचे नाव : तलाटी, लिपिक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, लिपिक टंकलेखक

एकूण पदे : 3088

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : 19 – 38 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : महाराष्ट्र

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : Rs 394 (मागासवर्गीय Rs 294)

शुधीपत्रक प्रसिद्धी दिनांक :  22 जुलै 2026

अर्ज शेवटची तारीख  : 10 ऑगस्ट 2026 

अधिकृत वेबसाईट  :  https://mpsc.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

तलाटी भरती 2026
पदसंख्या

अ.क्र. विभाग पदाचे नाव पदसंख्या
1 महसूल व वन विभाग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकरण) 1539
2 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क 11
3 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई सहाय्यक अधिक्षक, गट-क 11
4 कृषी व प.दु.म. विभाग सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क 254
5 नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकरण) 230
6 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकरण) 155
7 आदिवासी विकास विभाग लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकरण) 69
8 महसूल व वन विभाग लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकरण) 480
9 महसूल व वन विभाग लिपिक-टंकलेखक / नोंदणी व मुद्रांक विभाग 339
एकूण 3088

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

तलाटी भरती 2026
शैक्षणिक पात्रता

अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क कोणत्याही शाखेतील पदवीधर
2 वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क कोणत्याही शाखेतील पदवी
3 सहाय्यक अधिक्षक, गट-क कोणत्याही शाखेतील पदवी
4 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणी पदवी (B.F.Sc.)
5 लिपिक-टंकलेखक (नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय) कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच टंकलेखन अहर्ता आवश्यक
6 लिपिक-टंकलेखक (अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच टंकलेखन अहर्ता आवश्यक
7 लिपिक-टंकलेखक (आदिवासी विकास विभाग) कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच टंकलेखन अहर्ता आवश्यक
8 लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग) कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच टंकलेखन अहर्ता आवश्यक
9 लिपिक-टंकलेखक / नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच टंकलेखन अहर्ता आवश्यक

तलाटी भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पा प्रक्रिया
टप्पा 1 ऑनलाइन अर्ज
टप्पा 2 अर्ज छाननी
टप्पा 3 पूर्व परीक्षा (Offline – OMR)
टप्पा 4 मुख्य परीक्षा (पात्र उमेदवारांसाठी)
टप्पा 5 पदानुसार कौशल्य / शारीरिक चाचणी (लागू असल्यास)
टप्पा 6 कागदपत्र पडताळणी
टप्पा 7 अंतिम गुणवत्ता यादी
टप्पा 8 नियुक्ती

तलाटी भरती 2026
महत्वाची सूचना

MPSC तलाटी भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, टंकलेखन अहर्ता (लागू असल्यास), आरक्षण नियम, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व पात्रता अटी अधिकृत जाहिरात व शुद्धीपत्रकानुसार तपासून घ्याव्यात. या भरतीची पूर्व परीक्षा Offline (OMR आधारित) होणार आहे. अर्जाची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2026 असून परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 08 ऑगस्ट 2026 आहे. MPSC Rajyaseva Recruitment 2026, Talati Bharti 2026 आणि इतर नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या. उमेदवारांच्या सोयीसाठी माहिती संकलित करण्यात आली असून अंतिम निर्णय अधिकृत जाहिरात व शुद्धीपत्रकानुसारच ग्राह्य राहील.

तलाटी भरती 2026
भरतीतील महत्त्वाचे अपडेट्स

अ.क्र.प्रसिद्धी दिनांकदस्तऐवजमहत्त्वाचा बदल
125 जून 2026मुख्य जाहिरातMPSC परीक्षा 2026 ची मुख्य जाहिरात प्रसिद्ध. एकूण 2,619 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया बाबत जाहिरात प्रसिद्ध
216 जुलै 2026शुद्धीपत्रक क्र. 1पूर्व परीक्षा Offline (OMR आधारित) पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याच्या अंतिम तारखेत बदल करण्यात आला.
322 जुलै 2026शुद्धीपत्रक क्र. 2भरतीतील रिक्त पदांमध्ये वाढ करून एकूण 3,088 पदे वाढवून एकूण पदे 5707 करण्यात आली. सुधारित पदसंख्या आणि नवीन पदांचा समावेश करण्यात आला.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Talati Bharti 2026
Important Links

मूळ जाहिरात PDF :

शुद्धिपत्रक 1 PDF :

शुद्धिपत्रक 2 PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. MPSC Rajyaseva Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत?
उत्तर: शुद्धीपत्रकानुसार MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 5707 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

प्रश्न 2. MPSC Rajyaseva Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

प्रश्न 3. MPSC Rajyaseva Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: संबंधित पदानुसार कोणत्याही शाखेतील पदवी, B.F.Sc. किंवा जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आवश्यक आहे.

प्रश्न 4. MPSC परीक्षा CBT होणार आहे की OMR?
उत्तर: नाही. शुद्धीपत्रकानुसार संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही Offline (OMR आधारित) पद्धतीनेच आयोजित केली जाणार आहे. CBT पद्धत लागू राहणार नाही.

प्रश्न 5. MPSC Recruitment 2026 मध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वरिष्ठ अभिलेखपाल, सहाय्यक अधिक्षक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, लिपिक-टंकलेखक आणि इतर विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

प्रश्न 6. MPSC Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात आणि सर्व शुद्धीपत्रके कुठे पाहता येतील?
उत्तर: मुख्य जाहिरात, शुद्धीपत्रके, परीक्षा केंद्रासंबंधी सूचना आणि सर्व अधिकृत अपडेट्स NextBharti.com तसेच MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

Menu