आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज प्रक्रिया | Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026

Date : 10 August 2026 | प्रशांत पाटील

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 466 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. HSC उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही संधी आहे. अर्ज शुल्क ₹100 असून ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मराठीत उपलब्ध आहे.

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026

जाहिरात क्रमांक :  327/2026

जाहिरात द्वारे : जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (सेतू शाखा)

केंद्राचे नाव : आपले सरकार सेवा केंद्र

एकूण केंद्र : 466

शैक्षणिक पात्रता : किमान 12वी पास (MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य)

किमान वय : 18 वर्षे पूर्ण

ठिकाण  :  भंडारा

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹100/-

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  12 ऑगस्ट 2026

 अर्ज शेवटची तारीख  : 15 सप्टेंबर 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट  :  https://bhandara.gov.in/

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026
पदाचे स्वरूप

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. निवड झालेल्या VLE ला केंद्र शासनाने/राज्य शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार केंद्र चालवावे लागेल. केंद्रासाठी आवश्यक सुविधा, उपकरणे आणि नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था उमेदवाराने करणे आवश्यक आहे.

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता

पात्रतातपशील
शैक्षणिक पात्रताकिमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण
संगणक ज्ञानसंगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
MSCITMSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य
भाषामराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान
स्थानिक रहिवाससंबंधित ग्रामपंचायत/नगर परिषद/महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
वयकिमान 18 वर्षे पूर्ण
आर्थिक क्षमताआवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता
अनुभवCSC, महा-ई-सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभवास महत्त्व

भंडारा आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज प्रक्रिया
निवड प्रक्रिया

आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड प्रक्रिया एकूण 100 गुणांच्या गुणांकनावर आधारित आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, संगणक व डिजिटल साक्षरता, उपलब्ध सुविधा, आर्थिक क्षमता, ग्राहक सेवा व संवाद कौशल्य, अनुभव, व्यवसाय आराखडा, सामाजिक समावेशकता आणि चारित्र्य पडताळणी यांचा विचार केला जाणार आहे.

क्र.निवड प्रक्रिया
1अर्जांची प्राथमिक छाननी व पडताळणी
2गुणांकनाच्या आधारे कागदपत्रांचे परीक्षण
3प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी
4पोलीस पडताळणी
5जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत
6100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे
7प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागविणे
8अंतिम निवड व नियुक्ती आदेश
9अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्यांचा परिविक्षाधीन कालावधी
10समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता

भंडारा आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज प्रक्रिया
100 गुणांचे गुणांकन

निकषगुण
शैक्षणिक पात्रता10
संगणक व डिजिटल साक्षरता15
पायाभूत सुविधा15
आर्थिक क्षमता10
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखतीद्वारे)10
अनुभव20
व्यवसाय आराखडा व शाश्वतता5
सामाजिक समावेशकता5
चारित्र्य पडताळणी10
एकूण100

भंडारा आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज प्रक्रिया
आवश्यक पायाभूत सुविधा

सुविधा जाहिरातीनुसार अपेक्षा
कार्यालयीन जागा किमान 100 चौ. फूट कार्यालयीन जागा
संगणक/लॅपटॉप किमान दोन संगणक/लॅपटॉप
प्रिंटर लेझर प्रिंटर
स्कॅनर स्कॅनर
बायोमेट्रिक बायोमेट्रिक उपकरण
वेबकॅम वेबकॅम
वीज UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप
इंटरनेट ब्रॉडबँड इंटरनेट
CCTV CCTV व्यवस्था
नागरिक सुविधा नागरिकांसाठी प्रतीक्षाकक्ष
सूचना फलक शासनप्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक

भंडारा आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज प्रक्रिया
महत्त्वाची सूचना

भंडारा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र Recruitment 2026 ही पारंपरिक सरकारी नोकरी भरती नसून नागरिकांना शासकीय व डिजिटल सेवा देण्यासाठी केंद्र वाटपाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील रहिवास, कार्यालयीन जागा, संगणक व इंटरनेट सुविधा, आर्थिक क्षमता आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. विशेषतः 466 आपले सरकार सेवा केंद्रांपैकी आपल्या क्षेत्रासाठी कोणते केंद्र उपलब्ध आहे हे अधिकृत यादीत तपासूनच अर्ज करावा. या भरतीची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पुढील अपडेट्ससाठी NextBharti.com वर माहिती तपासा.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026
Important Links

भंडारा  जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. भंडारा आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 अंतर्गत किती केंद्रांची निवड होणार आहे?

उत्तर: भंडारा जिल्ह्यातील एकूण 466 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

प्रश्न 2. उमेदवार किती आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज करू शकतो?

उत्तर: उमेदवार फक्त एका आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो.

प्रश्न 3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.

प्रश्न 4. शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रश्न 5. आपले सरकार सेवा केंद्रासाठी किमान वय किती आहे?

उत्तर: अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

प्रश्न 6. अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज शुल्क ₹100/- आहे.

प्रश्न 7. MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

उत्तर: उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.

प्रश्न 8. निवड प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: अर्जांची प्राथमिक छाननी, कागदपत्रांचे परीक्षण, प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी, पोलीस पडताळणी, मुलाखत, 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी, प्राथमिक निवड यादी आणि अंतिम निवड अशा टप्प्यांद्वारे प्रक्रिया होईल.

प्रश्न 9. या भरतीची अधिकृत आणि संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

उत्तर: या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

Menu