भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026 : Next Navy Bharti 2026

Date : 02 July 2026  | प्रशांत पाटील

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026

Indian Navy Bharti 2026 अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 275 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी Next Indian Navy Bharti 2026 पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, निवड प्रक्रिया, सेवा कालावधी, वेतन, अर्जाची अंतिम तारीख आणि अधिकृत अधिसूचनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करावा. 

Indian Navy Bharti 2026 notification has been released for Short Service Commission (SSC) Officer recruitment. A total of 275 vacancies are available for eligible candidates. Interested applicants can check complete details including eligibility, age limit, educational qualification, selection process, service tenure, salary, important dates, online application procedure, and official notification before submitting their application. Apply online Next Indian Navy Bharti 2026 within the prescribed deadline.

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026

जाहिरात क्रमांक :  भारतीय नौदल SSC अधिकारी भरती जून 2027 बॅच

जाहिरात द्वारे : The Indian Navy

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी

एकूण पदे : 275

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली दिलेली आहे 

वयोमर्यादा :पदानुसार खाली दिलेली आहे 

नोकरीचे ठिकाण  :  संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  25 जून 2026 

अर्ज शेवटची तारीख  : 27 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://www.joinindiannavy.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026
पदांचा तपशील

अ.क्र.ब्रांचपदाचे नावरिक्त जागा
1एक्झिक्युटिव्ह ब्रांच (Executive Branch)जनरल सर्व्हिस (GS(X)) / हायड्रो कॅडर90
2एक्झिक्युटिव्ह ब्रांचपायलट (Pilot)25
3एक्झिक्युटिव्ह ब्रांचनेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (Observer)18
4एक्झिक्युटिव्ह ब्रांचएअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)15
5एक्झिक्युटिव्ह ब्रांचलॉजिस्टिक्स ऑफिसर10
6एक्झिक्युटिव्ह ब्रांचनेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर (NAIC)14
7एज्युकेशन ब्रांच (Education Branch)एज्युकेशन ऑफिसर13
8टेक्निकल ब्रांच (Technical Branch)इंजिनिअरिंग ब्रांच (GS)24
9टेक्निकल ब्रांचसबमरीन टेक इंजिनिअरिंग8
10टेक्निकल ब्रांचइलेक्ट्रिकल ब्रांच (GS)32
11टेक्निकल ब्रांचसबमरीन टेक इलेक्ट्रिकल8
12टेक्निकल ब्रांचनेव्हल कन्स्ट्रक्टर18
एकूण275

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026
वयोमर्यादा

ब्रांच पद जन्म तारीख
एक्झिक्युटिव्ह ब्रांच GS(X) / हायड्रो कॅडर 02 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008
एक्झिक्युटिव्ह ब्रांच पायलट (Pilot) 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2008
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (Observer) 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2008
एक्झिक्युटिव्ह ब्रांच एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006
एक्झिक्युटिव्ह ब्रांच लॉजिस्टिक्स ऑफिसर 02 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर (NAIC) 02 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008
एज्युकेशन ब्रांच एज्युकेशन ऑफिसर 02 जुलै 2000/2002 ते 01 जुलै 2006 (पदानुसार)
टेक्निकल ब्रांच इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, नेव्हल कन्स्ट्रक्टर, सबमरीन टेक 02 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026
पुरुष/महिला पात्रता

ब्रांच पद पात्र उमेदवार
एक्झिक्युटिव्ह ब्रांच GS(X) / हायड्रो कॅडर पुरुष / महिला
एक्झिक्युटिव्ह ब्रांच पायलट पुरुष / महिला
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर पुरुष / महिला
एक्झिक्युटिव्ह ब्रांच एअर ट्रॅफिक कंट्रोलर पुरुष / महिला
एक्झिक्युटिव्ह ब्रांच लॉजिस्टिक्स ऑफिसर पुरुष / महिला
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर पुरुष / महिला
एज्युकेशन ब्रांच एज्युकेशन ऑफिसर पुरुष / महिला
टेक्निकल ब्रांच इंजिनिअरिंग ब्रांच पुरुष / महिला
टेक्निकल ब्रांच इलेक्ट्रिकल ब्रांच पुरुष / महिला
टेक्निकल ब्रंच नेव्हल कन्स्ट्रक्टर पुरुष / महिला
टेक्निकल ब्रांच सबमरीन टेक (Engineering) फक्त पुरुष
टेक्निकल ब्रांच सबमरीन टेक (Electrical) फक्त पुरुष

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026
शैक्षणिक पात्रता

ब्रांच पद शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह ब्रांच GS(X) / हायड्रो कॅडर कोणत्याही शाखेतील BE/B.Tech (किमान 60%)
एक्झिक्युटिव्ह ब्रांच पायलट कोणत्याही शाखेतील BE/B.Tech (60%) तसेच 10वी व 12वी मध्ये इंग्रजी विषयात किमान 60% गुण
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर BE/B.Tech (किमान 60%)
एक्झिक्युटिव्ह ब्रांच एअर ट्रॅफिक कंट्रोलर BE/B.Tech (किमान 60%)
एक्झिक्युटिव्ह ब्रांच लॉजिस्टिक्स ऑफिसर BE/B.Tech / MBA / MCA / M.Sc.(IT) / B.Sc. / B.Com. + PG Diploma (पदानुसार)
एक्झिक्युटिव्ह ब्रांच नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर संबंधित अभियांत्रिकी शाखेतील BE/B.Tech किंवा Electronics/Physics मध्ये पदव्युत्तर
एज्युकेशन ब्रांच एज्युकेशन ऑफिसर M.Sc., M.A., BE/B.Tech किंवा ME/M.Tech (पदानुसार)
टेक्निकल ब्रांच इंजिनिअरिंग ब्रांच संबंधित अभियांत्रिकी शाखेतील BE/B.Tech (किमान 60%)
टेक्निकल ब्रांच इलेक्ट्रिकल ब्रांच Electrical / Electronics संबंधित BE/B.Tech (किमान 60%)
टेक्निकल ब्रांच सबमरीन टेक संबंधित इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल शाखेतील BE/B.Tech
टेक्निकल ब्रांच नेव्हल कन्स्ट्रक्टर Mechanical, Civil, Marine, Naval Architecture, Ship Building इत्यादी शाखेतील BE/B.Tech (किमान 60%)

भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पा
अर्जांची छाननी (Shortlisting)
SSB मुलाखत
वैद्यकीय तपासणी
अंतिम गुणवत्ता यादी (Merit List)
प्रशिक्षणासाठी निवड

Next Indian Navy Nharti 2026
महत्त्वाच्या सूचना

घटक माहिती
आयोगाचा प्रकार Short Service Commission (SSC)
प्रारंभिक सेवा कालावधी 12 वर्षे
सेवा वाढ जास्तीत जास्त 2 वर्षे
प्रशिक्षणादरम्यान वैवाहिक स्थिती फक्त अविवाहित उमेदवार पात्र
प्रारंभिक पद सब लेफ्टनंट (Sub Lieutenant)
अंदाजे प्रारंभिक वेतन ₹1,20,000 प्रतिमहिना (अंदाजे)

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Next Indian Navy Bharti 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. भारतीय नौदल SSC अधिकारी पदाचा सेवा कालावधी किती आहे?

उत्तर : भारतीय नौदलातील Short Service Commission (SSC) अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 12 वर्षांसाठी नियुक्ती दिली जाते. सेवेची आवश्यकता, कामगिरी, वैद्यकीय पात्रता आणि उमेदवाराची इच्छा यानुसार हा कालावधी कमाल 2 वर्षांनी वाढवता येतो. म्हणजेच, एकूण सेवा कालावधी 14 वर्षांपर्यंत असू शकतो

प्रश्न 2. अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात का?

उत्तर : होय. अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, इंडियन नेव्हल अकादमीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे.

प्रश्न 3. SSB मुलाखतीसाठी प्रवास भत्ता मिळतो का?

उत्तर : होय. संबंधित आयोगासाठी प्रथमच SSB मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना AC 3 Tier रेल्वे प्रवास भत्ता देण्यात येतो.

प्रश्न 4. NCC ‘C’ प्रमाणपत्रधारकांना काही सवलत मिळते का?

उत्तर : होय. पात्र NCC ‘C’ प्रमाणपत्रधारकांना SSB शॉर्टलिस्टिंगसाठी कट-ऑफ गुणांमध्ये 5% पर्यंत सवलत दिली जाते, मात्र जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रश्न 5. प्रशिक्षणादरम्यान विवाह करता येतो का?

उत्तर : नाही. प्रशिक्षणासाठी फक्त अविवाहित उमेदवार पात्र आहेत. प्रशिक्षणादरम्यान विवाह केल्यास उमेदवाराला सेवेतून मुक्त केले जाऊ शकते आणि शासनाने केलेला प्रशिक्षण खर्च परत भरावा लागू शकतो.

प्रश्न 6. निवड झाल्यानंतर उमेदवाराला कोणत्या पदावर नियुक्ती मिळते?

उत्तर : वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना सब लेफ्टनंट (Sub Lieutenant) या पदावर नियुक्ती दिली जाते.

प्रश्न 7. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंदाजे किती वेतन मिळते?

उत्तर : प्रशिक्षण पूर्ण करून सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रारंभिक एकूण वेतन अंदाजे ₹1,20,000 प्रतिमहिना असून त्यासोबत लागू असलेले विविध भत्तेही दिले जातात.

Menu