SBI PO भरती जुलै 2026 : 1500 जागांसाठी अर्ज सुरू पात्रता व संपूर्ण माहिती
Date : 5 July 2026 | प्रशांत पाटील
SBI PO भरती जुलै 2026 अंतर्गत 1500 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत अधिसूचनेची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
SBI PO Recruitment July 2026 has started for 1,500 Probationary Officer (PO) vacancies across India. This is an excellent opportunity for graduates seeking a career in the banking sector. Check complete details including eligibility, age limit, salary, selection process, exam pattern, important dates, application fee, and online application process on NextBharti.com. Interested candidates should apply online before the last date and stay updated with the latest SBI recruitment notifications.
SBI PO भरती जुलै 2026
जाहिरात क्रमांक : CRPD/PO/2026-27/09
जाहिरात द्वारे : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
एकूण पदे : 1500
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : 21-30 वर्ष (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 जून 2026
अर्ज शेवटची तारीख : 08 जुलै 2026
अर्ज शुल्क : ₹750 (SC/ST/PwBD शुल्क नाही)
अधिकृत वेबसाईट : https://sbi.bank.in/
पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे
SBI PO भरती जुलै 2026
पदसंख्या
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 1500 |
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे
SBI PO भरती जुलै 2026
शैक्षणिक पात्रता
| निकष | माहिती |
|---|---|
| शिक्षण | कोणत्याही शाखेतील पदवी |
| अंतिम वर्ष विद्यार्थी | पात्र (30 सप्टेंबर 2026 पूर्वी पदवी पूर्ण असणे आवश्यक) |
| मान्य अभ्यासक्रम | BA, BCom, BSc, BTech, MBBS, CA, ICWA इ. |
SBI PO भरती जुलै 2026
वेतन
माहिती
तपशील
प्रारंभिक बेसिक वेतन
₹48,480
SBI PO भरती जुलै 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | प्रक्रिया |
|---|---|
| टप्पा 1 | प्राथमिक ऑनलाइन परीक्षा (Preliminary Examination) |
| टप्पा 2 | मुख्य ऑनलाइन परीक्षा (Main Examination) |
| टप्पा 3 | मानसशास्त्रीय चाचणी (Psychometric Test) |
| टप्पा 4 | गट चर्चा / गट सराव (Group Exercise) |
| टप्पा 5 | वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) |
SBI PO भरती जुलै 2026
प्राथमिक परीक्षा पद्धत
| विषय | प्रश्न | गुण | कालावधी |
|---|---|---|---|
| इंग्रजी भाषा | 40 | 40 | 20 मिनिटे |
| संख्यात्मक क्षमता | 30 | 30 | 20 मिनिटे |
| तर्कशक्ती (Reasoning) | 30 | 30 | 20 मिनिटे |
| एकूण | 100 | 100 | 60 मिनिटे |
SBI PO भरती जुलै 2026
मुख्य परीक्षा पद्धत
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| तर्कशक्ती व संगणक क्षमता | 40 | 60 |
| डेटा विश्लेषण व अर्थ लावणे | 30 | 60 |
| सामान्य ज्ञान, अर्थव्यवस्था व बँकिंग | 60 | 60 |
| इंग्रजी भाषा | 40 | 20 |
| वस्तुनिष्ठ परीक्षा (Objective) | 170 | 200 |
| वर्णनात्मक परीक्षा (Descriptive) | 3 | 30 |
SBI PO भरती जुलै 2026
निगेटिव्ह मार्किंग
| माहिती | तपशील |
|---|---|
| चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी | संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 0.25 गुणांची कपात |
| उत्तर न दिल्यास | कोणतीही गुणकपात नाही |
SBI PO भरती जुलै 2026
महत्त्वाच्या सूचना
SBI PO भरती 2026 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील, त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करून सबमिट करणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करावा. अर्ज अंतिम सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी व इतर आवश्यक माहिती तयार ठेवावी. परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) योग्य वेळी अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे. तसेच SBI PO भरती 2026 संदर्भातील नवीन अपडेट्स, परीक्षा तारखा, प्रवेशपत्र, निकाल, कट-ऑफ, उत्तरतालिका आणि इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी NextBharti.com ला नियमित भेट द्या.
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
SBI PO भरती जुलै 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1. SBI PO भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹750 आहे. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे
प्रश्न 2. SBI PO भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर : निवड प्रक्रिया प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी (Psychometric Test), गट सराव (Group Exercise) आणि वैयक्तिक मुलाखत या टप्प्यांद्वारे केली जाईल.
प्रश्न 3. SBI PO भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अटींच्या अधीन राहून अर्ज करू शकतात.
प्रश्न 4. SBI PO भरती 2026 अंतर्गत किती पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?
उत्तर : SBI PO भरती 2026 अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या 1500 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रश्न 5. SBI PO भरती 2026 मध्ये नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) आहे का?
उत्तर : होय. प्राथमिक व मुख्य परीक्षेतील वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे संबंधित प्रश्नाच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल. उत्तर न दिल्यास कोणतीही गुणकपात होणार नाही.
प्रश्न 6. SBI PO भरती 2026 मध्ये अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) कशी तयार केली जाते?
उत्तर : अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षा (Objective + Descriptive) आणि मुलाखत तसेच ग्रुप एक्सरसाईजमधील गुणांच्या आधारे तयार केली जाते. प्राथमिक परीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.
प्रश्न 7. SBI PO भरती 2026 मध्ये निवड झाल्यानंतर सेवा बंधन (Bond) आहे का?
उत्तर : होय. निवड झालेल्या उमेदवाराने किमान 3 वर्षे SBI मध्ये सेवा देणे आवश्यक आहे
प्रश्न 8. SBI PO भरतीमध्ये देशाबाहेर काम करण्याची संधी मिळते का?
उत्तर : होय. SBI मध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांना भविष्यात बँकेच्या विदेशातील शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
प्रश्न 9. SBI PO भरतीमध्ये CIBIL स्कोअर तपासला जातो का?
उत्तर : होय. उमेदवारावर बँक किंवा वित्तीय संस्थेचे थकीत कर्ज अथवा प्रतिकूल CIBIL नोंद असल्यास नियुक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी CIBIL स्थिती तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न 10. 4. SBI PO भरतीमध्ये परिविक्षा कालावधी (Probation Period) किती आहे?
उत्तर : नियुक्तीनंतर उमेदवारांना 2 वर्षांचा परिविक्षा कालावधी (Probation Period) पूर्ण करावा लागेल. या कालावधीत त्यांच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन केले जाईल.