MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा | अंतिम दिनांक 17 जुलै 2026

Date : 26 June 2026 | प्रशांत पाटील

MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

महत्त्वाची सूचना

22 जुलै 2026 रोजी ह्या पोस्ट मधील जाहिरातीमध्ये बदल करण्यात आले आहेत, बदल पुढील प्रमाणे पदसंख्या 2619 होती त्यात अजून 3088 पदे वाढविण्यात आलेले आहेत, तरी खालील पोस्ट वाचून झाल्यावर 3088 पद्याची नवीन पोस्ट देखील वाचा. 

तलाटी भरती 2026 | MPSC कडून 5707 पदांची मोठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध विभागांतील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा. पात्रता, पदसंख्या, परीक्षा, आरक्षण, शुल्क आणि महत्त्वाच्या तारखांची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे.

MPSC Group C Combined Preliminary Examination 2026 notification has been released. Check eligibility, vacancies, important dates, and apply online before the deadline.

MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 माहिती

जाहिरात क्रमांक :  017 / 2026

जाहिरात द्वारे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग 


पदांची नाव : 

  • उद्योग निरीक्षक,
  • तांत्रिक सहायक,
  • कर सहायक,
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क,
  • लिपिक-टंकलेखक

एकूण पदे : 2619 पदे 

शैक्षणिक पात्रता : पदानुसार 

वयोमर्यादा :  19 – 38 वर्षे मागासवर्गीय /प्रा.खेळाडू/माजी सैनिक व इतर वय, जाहिरातीनुसार 

नोकरीचे ठिकाण  :  महाराष्ट्र 

अर्ज पद्धत :  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  27 जून 2026 

अर्ज शेवटची तारीख  :

मुदतवाढ  31 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://mpsc.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 माहिती
पदसंख्या

नाव

संख्या 

उद्योग निरीक्षक

9 

तांत्रिक सहायक

3

कर सहायक

282

सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क

461

लिपिक-टंकलेखक

1864

एकूण पदे 

2619

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
शैक्षणिक पात्रता

नाव

पात्रता

1. उद्योग निरीक्षक

(अ) सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकीमधील किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदवी, किंवा  (ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

2. तांत्रिक सहायक

कोणत्याही शाखेतील पदवी 

3. कर सहायक

कोणत्याही शाखेतील पदवी 

4. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क

एस.एस.सी. (10वी) उत्तीर्ण किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा,त्यानंतर खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक: 3 वर्षांची पदविका (Diploma) किंवा अभियांत्रिकी पदवी (Degree),
खालील डिप्लोमा/पदविका देखील समकक्ष म्हणून मान्य आहेत:

Diploma in Production Technology

Diploma in Production Engineering

Diploma in Mechanical Engineering

Diploma in Mechanical & Production Engineering

Diploma in Plant Engineering

Diploma in Automobile Engineering

Diploma in Motor Engineering

Bachelor Degree in Mechanical Engineering

Bachelor Degree in Automobile Engineering

Bachelor Degree in Production Engineering

Bachelor Degree in Industrial Engineering

Diploma in Marine Engineering

Diploma in Refrigeration Technology

Artificer Apprentice म्हणून 4 वर्षांचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण (4 Years Theoretical and Practical Training as an Artificer Apprentice) पूर्ण केलेले उमेदवार.

5. लिपिक-टंकलेखक

कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 शब्द/मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द/मिनिट

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Important Links

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजे काय?

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध गट-क पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे. ह्या परीक्षेत पास झाल्यानंतर पुढे अजून मुख्य परीक्षा असते त्यानंतर पुढे भरती प्रक्रिया होते.

प्रश्न 2: MPSC गट-क भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

उत्तर: या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2619 रिक्त पदे भरली जाणार होते, ते वाढवून आता एकूण 5707 पदे भरले जाणार आहेत.

प्रश्न 3: MPSC गट-क भरती 2026 साठी अर्ज कधी सुरू होणार?

उत्तर: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 जून 2026  पासून सुरू होणार आहे, आणि online अर्ज करण्याची शेवटची मुदत तारीख 31 जुलै 2026 पर्यंत आहे.

प्रश्न 4: कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक पदासाठी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

उत्तर: होय. या पदांसाठी मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या गतीचे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्रश्न 5: MPSC गट-क भरती 2026 साठी निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर: उमेदवारांची निवड संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि पदानुसार आवश्यक पात्रता व कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

प्रश्न 6: MPSC गट-क भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

उत्तर: उमेदवारांना MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात, पदनिहाय पात्रता, रिक्त जागा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती उपलब्ध आहे.

प्रश्न 7: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क परीक्षा कशी होणार offline कि online ?

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर offline पध्यतीने घेण्यात येईल.

प्रश्न 8: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क परीक्षेची महत्वाची सूचना काय आहे?

उत्तर: आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्रांच्या परिसरात तसेच चाचणी व मुलाखतीच्या वेळी फोन, अथवा इतर कोणत्याही प्रकरची इलेक्ट्रोनिक्स साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.

Menu